लोकसभा निवडणूक : ‘त्या’ पक्षाला मतदान न करण्याचा ठराव

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – दारुचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही, असा ठराव मुरुमगाव तालुक्यातील मुक्तीपथ गावातील महिला संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजुर केला आहे.

जवळ येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकात, मतदारांचे मत आपल्या झोळीत पाडण्यासाठी विविध पक्ष ग्रामीण भागात सर्रास दारु विक्रेत्यांना मदत करतात. याचा निषेध म्हणुन या महिलांनी या ठरावास एकमताने पाठींबा दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना देखील मतदारांना दारु पाजुन त्यांचे मत आपल्या पारड्यात पाडुन घेण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले जातात. जिल्ह्यातील विविध तालुक्यात हा प्रकार नेहमीच चालतो. तालुक्याच्या सीमावर्ती भागात याचे प्रमाण जास्त असते. मुरूमगाव येथील महिला हा प्रकार नेहमीच अनुभवतात. परंतु आता महिलांनी दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.

याही निवडणुकांमध्ये मतदारांना दारु व पैशाचे प्रलोभन दाखवले जाईल, असी शक्यता दिसुन येत आहे. म्हणुन गाव पातळीवर बैठका घेताना दारुचे आमिष दाखवणाऱ्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही. असे मत मंगळवारी या महिलांनी बैठकीत मांडले. या ठरामुळे राजकीय पक्षांना निवडणुकींच्या काळात अडचन निर्माण होन्याची शक्येता आहे.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ? 

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र शहीद 

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य