मोबाईल चोरीतील सराईत आरोपी गजाआड

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

मोबाईल चोरीतील सराईत आरोपीला येरवडा पोलीसांनी अतिशय शिताफिने अटक केले आहे. गजानन उंकडा भालेराव (वय-44, रा.निमगाव, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 8 एप्रिल रोजी 8.30 वाजण्याच्या सुमारास संगमवाडी पार्किंग नंबर-3 येथील चिंतामणी राॅयल ट्रॅव्हल्स च्या आॅफिसमधून 35 मोबाईल फोन असलेला बाॅक्स अज्ञात इसमाने पळवला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्या मोबाईल पैकी एक मोबाईल चालू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना ट्रेसिंगवरुन समजली होती.

मिळालेल्या माहितीवरुन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद महाजन, पोलीस निरीक्षक अशोक कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक संतोष दराडे यांच्या पथकाने देऊळगावराजा या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील चोरी गेलेले 35 मोबाईल फोन हस्तगत करुन आरोपीला बेड्या ठोकल्या.

सदरची कारवाई परिमंड-4 चे पोलीस उपायुक्त दिपक साकोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद महाजन, पोलीस निरीक्षक अशोक कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक संतोष दराडे, पोलीस नाईक किसन भारमळ, पोलीस नाईक राजेंद्र गायकवाड, पोलीस कर्मचारी विष्णू सरवदे, यांनी केली.