आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे : शरद पवार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आंदोलनाला बदनाम करुन मराठा आणि बहुजन समाजात फुट पाडण्याचा डाव आहे. राज्यकर्त्यांचा हा डाव हाणून पाठवावा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रक काढून केले आहे.
[amazon_link asins=’B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15c905f2-9d6a-11e8-95fa-f5cfee4466d5′]
मराठा आंदोलनाला बहुजनांचा पाठिंबा मिळालेला आहे. त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही, याची मराठा आंदोलकांनी काळजी घ्यायला हवी’, असं शरद पवार यांनी या पत्रकात म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केलं होतं. त्या आदर्शांना धक्का लागेल असं आंदोलन करू नका, असं आवाहनही त्यांनी केलंय.
[amazon_link asins=’B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f6fb9f5-9d6a-11e8-9c7f-b96d7b110712′]

मराठा समजाला बहुजन समाज व इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. त्यांची ही खेळी यशस्वी होऊ देऊ नका, असं सांगतानाच आरक्षणासाठी काही संविधानिक प्रक्रिया असतात. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यासाठी शांतता हवी आहे. शिवाय राज्यांतील उद्योग धंद्यातील गुंतवणूक थांबेल आणि बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असं आंदोलन करू नका, असही त्यांनी म्हटलं आहे.