‘त्या’ मनुष्यबळाचा राजकीय प्रचारासाठी वापर करण्यास प्रतिबंध

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या सरकारी अनुदानित, खासगी शिक्षण संस्था आणि सहकारी संस्था यांनी त्यांच्या मनुष्यबळाचा केवळ त्यांना नेमून दि्लेल्या संस्था कामकाजासाठीच वापर केला जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच, या मनुष्यबळाचा कोणत्याही परिस्थितीत राजकीय उमेदवारांच्या प्रचारासाठी वापर केला जाणार नाही, यासंदर्भातील लेखी हमीपत्र संबंधीत संस्थाचालकांनी द्यावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिले आहे.

यासंदर्भात अपर जिल्हादंडाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) तसेच जिल्हा परिषदेतील  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  यांना यासंदर्भात कार्यवाही करण्यास सांगितले आहे. तसे पत्रच या प्रमुखांना आचारसंहिता कक्षाकडून देण्यात आले आहे.

संस्थाचालकांकडून घेतल्या जाणार्‍या लेखी हमीपत्रात आचारसंहिता पालनाबाबत त्यांना पूर्ण जाणीव असल्याबाबतची लेखी ग्वाही घेण्यात यावी तसेच अशा संस्थांमधील मनुष्यबळाचा गैरवापर केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल, याबाबतही त्यांना स्पष्ट जाणीव द्यावी. तसेच, अशा घटना घडल्यास त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबतही निर्देशीत करण्यात आले आहे.

ह्याही बातम्या वाचा –

खुशखबर ! रेल्वेत मोठी भरती – १ लाख नोकऱ्या, अर्ज प्रक्रिया सुरु

पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार

पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार

दोन सराईत गुन्हेगार अटकेत

खुशखबर ! रेल्वेत मोठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु