फक्त पाण्यानेच नव्हे, तर बेकिंग सोडा वापरून धूवा फळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाण्याखाली फळे धुतल्याने धूळ-माती निघून जाते. परंतु, पेस्टिसाइड्स जात नाहीत. फळे पिकवण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी, दीर्घकाळ टीकण्यासाठी त्यांच्यावर रसायनांचा मारा केला जातो. ही रसायने अतिशय धोकायदायक असतात. हे पेस्टिसाइड्स बेकिंग सोडा वापरावा. बेकिंग सोडा फळांवरील पेस्टिसाइड्स काढण्यासाठी जास्त परिणामकारक आहे. जर्नल ऑफ अग्रिकल्चर अँड फूड केमि. मध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अभ्यासकांनी सफरचंदावर हा प्रयोग करून पाहिला. एक सफरचंद कोलोरोक्स ब्लिचमध्ये, दुसरे सफरचंद बेकिंग सोडामध्ये, तिसरे सफरचंद नळाच्या पाण्याखाली धुतले आणि यावर किती पेस्टिसाइड्स आहेत हे तपासले गेले. यावेळी असे दिसून आले की इतर उत्पादनांच्या तुलनेत बेकिंग सोडा आणि पाण्यात ८ मिनिटे बुडवून ठेवलेल्या सफरचंदावर कमी पेस्टिसाइड्स होते.

तर १२ ते १५ मिनिटांनंतर सफरचंदावरील सर्व पेस्टिसाइड्स गेले होते. थायबेंडाजोल आणि फॉस्फेट या दोन पेस्टिसाइड्सवर बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट परिणामकारक आहे. यामुळे फळे धुताना बेकिंग सोड्याच्या पाण्यात धुणे आरोग्यासाठी खूपच आवश्यक आहे.