PM की GG च्या चेहऱ्यांवर BJP दिल्लीत निवडणुक ‘लढणार’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर भाजपाकडून कोण मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असणार हे जाहीर करण्यास भाजपामध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुक जिंकणार आहोत, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. क्रिकेटपटू आणि भाजपाचे दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी अचानक दिल्लीतील प्रश्नावर रुची घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले आहे.

प्रदेश भाजपाचे माजी अध्यक्ष विजय गोयल यांनीही प्रकाश जावडेकर यांची री ओढली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखली आम्ही दिल्ली विधानसभेत बहुमत मिळवू असे सांगितले आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल असे विचारता हे भाजपा नेते जनतेचा प्रत्येक मतदार हा भाजपाचा चेहरा असणार असल्याचे सांगत आहे.

क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत रस घेणे सुरु केले आहे. आम्ही जिंकलो तर दिल्लीकरांना स्वच्छ पाणी आणि निरोगी हवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे एका चॅनेलला मुलाखत देताना सांगितले. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासमोर गौतम गंभीरला पुढे करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/