निंबोडी शिवारात युवकाचा मृतदेह

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जामखेड रस्त्यावरील निंबोडी परिसरात आज सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला आहे. मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
निंबोडी परिसरात अनोळखी मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून कँप पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारची इजा किंवा जखम आढळून आले नाही. सदर मयताची ओळख पटलेली नाही. मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू आहे.
सदर मृतदेह कोणाचा व मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कदाचित थंडीमटने गारठून युवकाचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यताही वर्तवली जात आहे.