पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि उपमहापौर यांच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष्यात नागरिक घसरले

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राहुल जाधव यांचा विजय झाला असून राष्ट्रवादीच्या विनोद नढे यांचा पराभव झाला आहे. याचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर भंडारा उधळून केला यामुळे महानगर पालिकेच्या परिसर पिवळा दिसत होता. जल्लोष सुरू असताना पावसाच्या हलक्या सरी पडल्याने भंडाऱ्याचा चिखल झाला आणि ११ जण दुचाकीवरून घसरले अशी माहिती प्रत्येक्ष दर्शीनी दिली आहे. यात एका अपंग व्यक्तीचा समावेश असल्याचं देखील समोर आलं आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc54f4db-97da-11e8-9c94-d7152fbbccab’]

पिंपरी-चिंचवड मध्ये आज महापौर पदासाठी निवडणूक झाली यात भाजपाचे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे हे विजयी झाले. यामुळे चिंचवडे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जलोष्याचे वातावरण होते. महापौर पद हे राहुल जाधव यांनाच मिळणार होते त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जल्लोष्याची तयारी कार्यकर्त्यानी केली होती. तर चिंचवडे यांचे देखील कार्यकर्ते या जल्लोष्यात सहभागी होते. जेसीबी बकेट मध्ये बसून भंडाऱ्याची पोती उधळण्यात आली सोबतच ढोल ताशा पथक देखील होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष्याची वातावरण होते.

मात्र मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळा गेला तेवढ्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या आणि भंडाऱ्याचे रूपांतर पिवळ्या चिखलात झाले, यामुळे नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला एवढेच नाही तर ११ नागरिक हे दुचाकीवरून घसरून पडल्याची माहिती प्रत्येक्ष दर्शीनी दिली आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष हा सामान्य नागरिकांना चांगलाच महागात पडला अस म्हणायला काही हरकत नाही.

खालील लिंक च्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/