‘CM’ देवेंद्र फडणवीसांच्या मतदार संघात 3064 जणांकडून ‘NOTA’ चा वापर !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणावर महाजनादेश तसेच निवडणुक प्रचाराच्या काळात मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन मी पुन्हा येईन असा जयघोष केला. पण त्यांच्याच मतदारसंघात नाराजांची संख्या अधिक असून तब्बल ३ हजार ६४ जणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाकारले आहे.

निवडणुकीत उभे असलेल्यांपैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याचे कारण देऊन अनेक जण मतदान टाळत आले आहेत. त्यामुळे काही निवडणुकांपासून कोणताही उमेदवार मान्य नसल्याच नोटा हा पर्याय मतदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा होती.

मात्र, या नोटाचा आता अनेक जण निषेध म्हणून वापर करु लागले आहेत. आपल्याला पसंत नसलेला उमेदवार पक्षाने दिला आहे. त्यामुळे त्याला मतदान करायचे नाही. पण दुसरीकडे दुसऱ्या पक्षालाही मतदान करायचे नाही. अशावेळी वेगवेगळ्या पक्षाचे समर्थक निषेध म्हणून नोटाचा वापर करतात.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नागपूर पश्चिम मतदारसंघात तब्बल ३ हजार ६४ जणांना फडणवीस हे उमेदवार म्हणून पसंत नसल्याचे दिसून आले आहे.बारामती मतदारसंघातून अजित पवार यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्यांनी विजय मिळविला. तेथेही १ हजार ५५९ जणांनी नोटाचा वापर केला.

कोथरुड मतदारसंघातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडून आले. त्यांची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा त्यांना बाहेरचा, पूरात वाहून आलेला म्हणून मोठ्या प्रमाणावर टिका झाली. कोथरुडमध्ये तब्बल ४ हजार २८ जणांनी नोटाचा वापर करुन आपल्याला चंद्रकांत पाटील हे उमेदवार मान्य नसल्याचे सांगितले आहे.
जेथे उमेदवार पंसत नाही अशा अनेक मतदार संघात कार्यकर्त्यांनी दुसºया पक्षाला मतदान करण्याऐवजी नोटाचा वापर केल्याने यंदा राज्यभरात नोटाची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

Visit : policenama.com