सांगली जिल्हा बँक संचालकांचे सामूहिक राजीनामे

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सादर केले. यापूर्वीसुद्धा असा प्रयत्न संचालकांनी केला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’30fe8ddb-a60b-11e8-b121-3912c681d88c’]

दिलीप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम विकाराने अशक्यच झाले आहे असे या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. प्रत्यक्षात यामागे नोकरभरतीचे कारण असल्याची चर्चा आहे. दरम्यान नोकरभरतीत कोणाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, अशी भूमिका दिलीप पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी कालच त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सातत्याने दिलीप पाटील यांना पाठबळ दिल्याने आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अध्यक्ष पाटील यांच्याकडून नोकरभरतीला प्रतिसाद नसल्याची संचालकांत जोरदार चर्चा आहे. राज्यातील पाच जिल्हा बॅंकांतील नोकरभरती केली. मात्र तेथील संचालक मंडळ या कारणावरून विद्यमान राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त केल होते. नोकरभरतीची प्रक्रिया सुरु करु असे केवळ आश्‍वासन पाटील यांनी दिले होते. त्यातून असंतोष होता. अखेर काल रात्री एकाचवेळी राजीनामे देण्यात आले.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39080d34-a60b-11e8-940f-fbddf27d6a6f’]

दरम्यान, बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले की राजीनाम्यांबद्दल मला काही माहित नाही. मी नेहमीच बँक हिताचे निर्णय घेतलेत. म्हणून बँक राज्यात क्रमांक एकवर आहे. मला जयंत पाटील यांनी अध्यक्ष केल्याने पदाबाबत तेच योग्य निर्णय घेतील.