लोकसभा निवडणुकी बाबत आयोगाचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे लोकसभेच्या निवडणुका पुढे जाण्याचे भाकीत वर्तवण्यात येत होते. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपले स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुका या ठरलेल्या वेळेतच होतील. त्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे असे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

भारतात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निवडणुकीच्या तारखांबद्दल निश्चित सांगता येणार नाही. तसेच निवडणूक आयोग कश्मीरमध्ये सीमेवर होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे असे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यावर सांगितले होते.

मतदानाच्या अगोदर ४८ तास प्रचाराला बंदी घालण्याच्या बाबत आम्हाला अनेक राजकीय पक्षांनी मागणी केली आहे. आम्ही याबबाबत विचार करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय घेतला जाईल असे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे.