फडणवीस सरकार बहुजन समाजाची दिशाभूल करतयं : सचिन साठे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

फडणवीस सरकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर दिशाभूल करीत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसात मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3e1ef76a-9bdb-11e8-be2e-ffe1f070e56c’]
महाराष्ट्रातील तमाम जनतेने फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवून भाजपला सत्ता दिली. भाजपला सत्ता मिळून चार वर्षे उलटून गेली तरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वेळ काढूपणा करीत आहे. आघाडी सरकारने २०१३ लाच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आता देवेंद्र फडणवीस सरकार मात्र, न्यायालयाचा मुद्दा पुढे करुन मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल करीत आहे.

अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरी येथे गुरुवारी केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब पुतळा चौकात गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद निमित्त झालेल्या ठिय्या आंदोलनात मार्गदर्शन करताना साठे बोलत होते.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’436d4e12-9bdb-11e8-9621-4bcf632b43e4′]

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळ पासून धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. सकाळ पासून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.