ससून रुग्णालयात पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

शासकीय रुग्णालयांशी संलग्न असणाऱ्या ससुन रुग्णालयात २२ तारखेला एक यशस्वी यकृत प्रत्यारोपण अत्यंत अल्प दरात करण्यात आले.

साताऱ्याचे ५८ वर्षीय निवृत्त शिक्षक यांना मागील तीन वर्षापासुन यकृताचा आजारने ग्रासले होते. यासाठी त्यांनी अनेक रुग्णालयाचे खटे घातले. ज्यात त्यांना यश आले नाही. यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात नाव नोंदवले होते. ज्यात त्यांचा अल्प दरात यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेसाठी, साताऱ्याहुन एका ब्रेन डेड रुग्णाचे यकृत आणण्यात आले. यासाठी, डॉ. कमलेश बोकील, डॉ. संतोष थोरात, मेट्रन राजश्री कोरके, नर्स धरणा जगताप यांनी विशेष कष्ट घेतले. या शस्त्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची तांत्रीक अडचण येऊ नये म्हणुन, डॉ. शितल धाडफाले, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. रुबी हॉल रुग्नालयातुन डॉ. वंदना डुबे , डॉ. किरण जाधव , डॉ. अजय तवारे यांनी सहकार्य केले तर, डॉ. विद्या केळकर , डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी, डॉ. हरीश तातिया यांनी ही यासाठी विशेष सहकार्य केले.

जाहिरात

यावेळी बोलताना, ससून रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ. अजय चंदनवालावाले म्हणाले, सरकारी रुग्णालय सह अनेक खाजगी संस्थाही अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दानचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

ज्यातुन त्यांनी जवळपास ९ यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. यातुन आम्ही अधीक का अधीक गरिब लोकांचे मदत करता येईल असे ही त्यांनी नमुद केले.

जाहिरात