… तरी सरकार टिकणार : संजय राऊत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांनी स्वतःचे सत्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी राज्यातील सरकार टिकून राहील, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला चिमटा काढला आहे. आमचे संख्याबळ कमी असल्याने आमची तलवार वर्षभरापूर्वीच तोकडीच होती. मात्र, रणांगणावर आम्ही एकच पाऊल अधिक उचलून टाकल्याने आज टिकून आहोत, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले.

सामनातील रोखठोक या सदरातून भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “भाजप व मित्र पक्षांचे ११२ आमदार असून त्यांना विरोधात राहावे लागले. त्यांच्यादृष्टीने महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक सरकार आहे. हे सरकार लवकरच पडेल असे भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे. त्यासाठी गुप्त कारवाया आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर करावा लागणार, हे ते जाणून आहेत. मात्र, ईडी सारख्या संस्थांनी स्वतःचे सत्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी राज्यातील सरकार टिकून राहील, असे मी जबाबदारीने सांगतो.”

तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायचंच असत…

विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केलं असून, ते घटनेच्या चौकटीतच आहे. कोणतेही सरकार नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते जोपर्यंत ते टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचचं असते. अटलबिहारी वाजपेयी यांनीही ३७ भिन्न विचारांच्या पक्षाचे सरकार पाच वर्षे चालवले. ते सरकार कोणासही अनैसर्गिक वाटले नाही. राज्यावर कोविड, पूर, निसर्ग वादळ आणि टाळेबंदीसारखी संकटे आली नसती तर वर्षभरात महाराष्ट्राचं चित्र वेगळे असते.

सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य

महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांपैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही, हे अमित शाह यांचे प्रगल्भ विधान आहे. अजित पवारांवर लक्ष ठेवा सांगितले जात आहे पण तेच सर्वात जास्त भरवशाचे आहेत. मंत्र्यांची नाराजी ही व्यक्तिगत मानापमानाची आहे. बहुमतातील सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य आहेत, अशा प्रवृत्तिविरोंधात महराष्ट्र म्हणून लढावं लागेल, असे परखड मतही राऊत यांनी मांडले.

You might also like