जेव्हा ‘द ग्रेट खली’नं खाल्ली 4 किलो भाजी आणि 40 रोट्या ! मित्राच्या बायकोनं ‘असा’ केला अपमान

पोलिसनामा ऑनलाइन –द ग्रेट खली नावानं प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय वंशाच्या डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलरचं खरं नाव दिलीप सिंह राणा आहे. दिलीप रेसलिंगमध्ये येण्याआधी पंजाब पोलिसात काम करत होता. खलीची छाती 56 इंच नाही तर 63 इंच आहे. खलीबद्दल तुम्हाला बरंच काही माहिती असेल. आज आपण खलीचे इंस्ट्रेटिंग किस्से जाणून घेणार आहोत.

द ग्रेट खली खाण्यापिण्याच्या बाबतीत इतर पैलवानांच्या एकदम उलट आहे. नॉनव्हेजपासून दूर असणारा खली फक्त अंडी खातो. बाकी इतर प्रकारचा कोणताही मांसाहार तो करत नाही. त्याला तंबाखू दारू असं कसलंही व्यसन नाही. रोज संध्याकाळी खली 10 लिटर दूध, 20 उकडलेली अंडी, 5 ग्लास मिक्स ज्यूस, 5 ग्लास डाळिंबाचा ज्यूस पितो. त्याचा डाएटच त्याच्या हेल्थचं रहस्य आहे.

एकदा खली आपल्या मित्राकडे मुक्कामी होता. जेव्हा तो जेवायला बसला तेव्हा डायनिंग टेबलचा नजारा पाहून मित्राच्या पत्नीचा पारा हाय झाला. 10 मिनिटातच त्यानं 40 रोट्या खाल्ल्या. 4 किलो भाजी तसेच 8 कटोरी डाळही पिली. हे पूर्ण जेवण त्याच्या मित्राच्या बायकोनं फॅमिलीसाठी तयार केलं होतं जे खलीनं एकट्यानं फस्त केलं होतं. मित्राच्या बायको म्हणाली, ह्यांना परत कधीच इकडे आणू नका. हे ऐकल्यानंतर खलीला खूपच वाईट वाटलं. आपल्या सवयीमुळं त्याला लाजिरवाणं वाटलं.

ग ग्रेट खलीची आज 6000000 डॉलरची संपत्ती आहे. कधी तो दगडं फोडण्याचं काम करत होता. आज तो एक इंटरनॅशनल स्टार आहे. धिराना हे त्याचं गाव आहे. पोलीस ऑफिसर भुल्लरची खलीवर नजर पडली आणि यानंतर तो पंजाब पोलीसमध्ये भरती झाला होता.

खलीनं पंजाबमध्ये स्वत:चं रेसलिंग स्कुल सुरू केलं आहे. प्रोफेशनल रेसलिंगमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता खली पत्नी हरमिंदर कौर सोबत आयुष्य घालवत आहे.