अचानकपणे वृध्दाच्या छातीत दुखू लागल्यानंतर GRP च्या जवानानं खांद्यावर उचललं अन् धावतच सुटला, वाचवले ‘प्राण’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील घाटकोपर स्थानकावर एका जीआरपी जवानामुळे वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला. जेव्हा स्टेशनवर उपस्थित असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या छातीत वेदना होऊ लागल्या, तेव्हा जवनाने, वेळ न गमावता, त्या व्यक्तीस तातडीने आपल्या खांद्यावर उचलून घेतले आणि स्टेशनच्या बाहेर पोहोचला , ज्यामुळे त्या वृद्ध व्यक्तीस योग्य वेळी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकले. दरम्यान, प्रत्येकजण जीआरपी जवानाच्या धाडसाचे कौतुक करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गच्छे दुपारी अडीचच्या सुमारास मुंबईतील घाटकोपर स्थानकावरून जात होते. स्टेशनवर असतानाच त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ते स्टेशनवरच पडले. प्रकाश पडताच तेथे गर्दी होती. यावेळी ड्युटीवर तैनात रेल्वे पोलिस कर्मचारी धनंजय गवळी येथे पोहोचले. धनंजयला प्रकाशच्या छातीत दुखत असल्याचे समजताच त्याने कोणीही येण्याची वाट न पाहता प्रकाशला त्याच्या खांद्यावर उभे उचलून आणि बाहेरून धावण्यास सुरवात केली.

जवानाला अश्या प्रकारे वृद्ध व्यक्तीस घेऊन पळताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. धनंजयने प्रकाश यांना राजावाडी रुग्णालयात नेलं आणि आयसीयूमध्ये दाखल केलं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश यांच्या तब्येतीत आता सुधारणा आहे. जवानाने समजूतदारपणा दाखवून ज्येष्ठांचे प्राण वाचविले, याबद्दल प्रत्येक जण कौतुक करीत आहे.