जगातील एकमेव सलामीचा फलंदाज जो कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावांमध्ये राहिला नाबाद

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कसोटी क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजाची खुप महत्वाची भूमिक असते, कारण नव्या चेंडूचा सामना करण्यासह त्यास कठिण स्थितीला सुद्धा तोंड द्यावे लागते. जेणेकरून नंतर येणार्‍या फलंदाजासाठी काम सोपे व्हावे आणि संघाला मोठी धावसंख्या बनवता येईल. परंतु टी-20 क्रिकेट आल्यानंतर आतापर्यंत हे दिसून येत आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजामध्ये धैर्य कमी दिसून येते.

ज्यामुळे ते चूक करतात आणि संघाच्या मधल्या फळीवर अतिरिक्त दबाव येतो. सध्याच्या काळात खुपच कमी सलामीचे फलंदाज सापडतील जे मोठी धावसंख्या बनवू शकले आहेत. परंतु वेस्टइंडीजचा सलामीचा फलंदाज क्रेग ब्रॅथवेटचा समावेश शानदार फलंदाजांमध्ये होतो. ज्याच्या पाठीमागे सर्वात मोठे कारण कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक आगळवेगळा विक्रम सुद्धा नोंदला जाणे हे आहे.

क्रेग ब्रेथवेट कसोटी क्रिकेटमध्ये एकमेव असा फलंदाज आहे, जो संघाच्या डावाची सुरूवात करण्यासह दोन्ही डावात पॅव्हेलियनमध्ये नाबाद परतला आहे. 2016 मध्ये वेस्टइंडीजची टीम पाकिस्तानच्या दौर्‍यावर होती. या मालिकेच्या सुरूवातीचे दोन्ही सामने गमावल्याने विंडीजच्या संघाला तिसरी कसोटी जिंकून आपला सन्मान राखायचा होता.

पहिला डाव
पाकिस्तानी संघासोबत शारजाहमध्ये ही कसोटी खेळली गेली. यामध्ये तिसर्‍या दिवशी ब्रेथवेटने आपले शतक पूर्ण केले आणि अखेरीस ब्रॅथवेट 142 धावांवर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. वेस्टइंडीजच्या टीमने पहिल्या डावात 337 धावा बनवून महत्वपूर्ण आघाडी मिळवली. यानंतर वेस्टइंडीजच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या दुसर्‍या डावाला 208 च्या धावसंख्येवर गुंडाळून संघाला सामना जिंकण्याच्या स्थितीत आणून उभे केले.

दुसरा डाव
पुन्हा एकदा क्रेग ब्रेथवेटवर पहिल्या डावासारखीच कामगिरी करण्याची जबाबदारी होती. मात्र, अर्धा विंडीज संघ केवळ 67 च्या धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. ज्यामुळे असे वाटू लागले की, पाकिस्तान ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर करणार. परंतु ब्रेथवेटने आपल्या पहिल्या डाव्यातील मेहनत वाया जाऊ दिली नाही. शेन डावरीचसोबत त्याने 87 धावांची महत्वाची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. ज्यामध्ये ब्रेथवेटने दुसर्‍या डावात नाबाद 60 धावा बनवण्यासह वेस्टइंडीज संघाला विजय मिळवून दिला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.