नागपुर पावसाळी अधिवेशन समस्येच्या गर्तेत, प्रयोग अंगलट येण्याची शक्यता

नागपूर : पोलीसनामा आॅनलाईन

प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये होणारे पावसाळी अधिवेशन पावसाचे कारण सांगत नागपुरला हलविण्यात आले. खरंतर हा प्रयोग होता. मात्र आता हा प्रयोगच फसल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. आज (शुक्रवार) सभागृहातील वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे दिवसभरासाठी कामकाज बंद करावे लागले आहे. यावरुन विधीमंडळ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगेलच धारेवर धरले आहे. या सरकारला कोणत्याच गोष्टीचं गांभिर्य राहिलेलं नाही. अक्षरशः यांचा पोरखेळ चालला आहे. त्यामुळे कामकाजाचा आजचा दिवस वाया गेला आहे.या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी याची भरपाई दिली पाहिजे असे अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.  मुंबईत जोरदार होणाऱ्या पावसाचे कारण सांगत अधिवेशन नागपुरला घेण्याचे ठरले. परंतू नागपुरात देखील जोरदार पाऊस पडतो आहे.
[amazon_link asins=’B07FH4PDHJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1cf5ecaa-80f2-11e8-8c1e-2fdbba58801e’]
या सरकारने राज्याला चार लाख कोटी कर्जाच्या खाईत लोटले आहे. असे असतानाही किती बेपर्वाईने काम चालते याचं मूर्तीमंत उदाहरण आज पहायला मिळाले. जनतेने दिलेल्या टॅक्समधून पैसे जमा होतात आणि त्यातून खर्च केला जातो. आज कामकाज का बंद झाले तर जोरदार पाऊस पडल्यामुळे विधीमंडळाच्या परिसरातील गटारे तुंबली. त्या पाण्यात विजेचं सबस्टेशन गेल्यामुळे सभागृहाची लाईट गेली आणि त्यामुळे आजचं कामकाज बंद करण्यात आलं. याला जबाबदार कोण आहे. का गटारे साफ केली नाहीत. पावसाळा सुरु होण्याच्याआधी महानगरपालिकेचे, विधीमंडळाचे, सरकारचे काम नव्हते का ? हे सरकार झोपा काढतंय का?असा संतप्त सवाल अजितदादांनी केला.

हे अधिवेशन घ्यायची आवश्यकता अजिबात नव्हती. कारण यांची कोणतीही तयारी नव्हती. नेहमी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेत होतो. फार तर दोन आठवडयाऐवजी तीन आठवडे , चार आठवडे करा. आमची बसायची तयारी आहे. १ तारखेला अधिवेशन सुरु करा आणि २४ तारखेला संपवा. चार आठवडे जरी अधिवेशन झाले तरी कामकाज व्यवस्थित होवू शकते. परंतु कुणाच्यातरी बालहट्टापायी अशाप्रकारचा निर्णय घेतला असा आरोपही अजितदादांनी केला.