‘रॅपिड’ तपासणीमधूनच ‘महामारी’च्या प्रसाराची माहिती मिळेल, जनतेनं आग्रह करू नये : ICMR (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना बाधितांचा आकडा 13 हजाराच्या जवळ पोहचला आहे. तर 420 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले की, जिल्हास्तरावर कोरोनाचा प्रादुर्भावासाठी बनवण्यात येणाऱ्या योजनेबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसेच दोन चीनी कंपन्यांकडून रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटसह पाच लाख चाचणीचे किट भारताला प्राप्त झाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे डॉ. रमन आर. गंगाखेडकर म्हणाले, आपल्याला चीनमधील दोन कंपन्यांकडून एकूण 5 लाख रॅपिड चाचणी किट मिळाले आहेत. या दोघांची चाचणी करण्याची पद्धत वेगळी आहे. हे रोगप्रतिकारक शक्तीची तपासणीसाठीचे किट आहेत. शरीरातील या अँटी-बॉडी टेस्ट किटचा उपयोग कोरोनाच्या प्रारंभिक तपासणीसाठी केला जाईल.

आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, लोकांना प्राथमिक चाचणीसाठी प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागेल. सर्वसामान्यांनी या रॅपिड चाचणीची मागणी करु नये. याचा उपयोग कोरोना तपासणीसाठी नाही तर कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी करण्यात येणार आहे.

डॉ. गंगाखेडकर पुढे म्हणाले, देशात 24 रुग्णाची तपासणी केल्यानंतर एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. जपानमध्ये हा आकडा 11.7 चाचणीमध्ये 1 पॉझिटिव्ह तर इटलीमध्ये प्रत्येक 6.7 लोकांच्या तपासणीवर 1 पॉझिटिव्ह आहे. तर दुसरीकडे अमेरिकेत हाच आकडा 5.3 आणि ब्रिटनमध्ये 3.4 आहे.