सत्तेतील रावणे दहन करा……

नांदेड : (माधव मेकेवाड) – देशात चालु असलेला दसरा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे करत असतात असा दसरा मेळावा नांदेड शहरात विजया दशमीच्या निमित्ताने आयोजित रावन दहनाचा कार्यक्रम दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आडीच कोटी मंजूर करुन सिडकोतील रस्ताचे भूमिपुजन नुकतेच झाले आहे. यापुढेही या परिसरात जेवढी विकास कामे करता येतील तेवढी करु, उपमहापौर विनय पाटील गिरडे आपण जोरदार पद्धतीने काम करा, आम्ही सर्वजन तुमच्या पाठीशी आहोत. असे मत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

प्रतिवर्षापणे यंदाही दसरा उत्सवा निमित्ताने नांदेड महापालिकाचे उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी दसऱ्या निमित्याने गुरुवारी हडको येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण हे बोलत होते. या सोहळ्याला माजी मंत्री आ.डी.पी.सावंत, आ.अमर राजूरकर, महापौर सौ.शिला किशोर भवरे, आयोजक गिरडे आदींसह इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

पुढे बोलताना खा.अशोकराव चव्हाण म्हणाले की, राज्य व केंद्र शासन हे रावण अपप्रवर्तीचा आदर्श घेत आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ही सत्तेतील रावणे आपणास दहन करावे लागतील, मनपा निवडणूकीत दिलेले आश्वासन आम्ही पुर्ण करत याप्रसंगी सुमारे आडिच कोटी रुपयांचा सिडकोच्या मुख्य रस्ता दुरुस्तीकरणाचा शुभारंभ नुकताच केला आहे. यावेळी माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, आ.अमर राजूरकर, यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित आयोजक तथा उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी केले. सुत्रसंचालन तथा आभार बालाजी गवाले यांनी केले. रावण दहन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश बस्वदे, राजूभाऊ लांडगे, रवी रायबोळे, अमर बायस, गजानन गिरडे, सह उपमहापौर विनय पाटील गिरडे मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले. सोहळा अतिशय उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती देखील होती.