Monsoon Alert : परतीच्या पावसाचा मुक्काम आता ‘या’ तारखेपर्यंत वाढला

मुुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात थैमान घातलेल्या परतीच्या पाऊस अद्यापही परतलेला नाही, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार परतीच्या पावसाने मुक्काम वाढला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी 21 ऑक्टोबरपर्यंत रिपरिप सुरू असणार आहे. अरबी समुद्र, बंगालच्या खाडीतील हवामानात सतत बदल होत आहेत. याचा परिणाम म्हणून पाऊस आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह आहेत.

त्यानुसार राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. अतिवृष्टीने पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं आहे. मात्र अद्यापही पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कोकण, गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे.

सर्वसाधारणपणे 5 ऑक्टोबरपूर्वी राज्याच्या पूर्वेकडून परतीच्या पावसाला सुरुवात होते. त्यानंतर 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश भाग, मध्य प्रदेशातील पुर्वेकडील भाग, छत्तीसगडमधील उत्तरेकडील भाग असा त्याचा प्रवास असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि महाराष्ट्रात परतीच्या पाऊस 1 आठवड्यांनी लांबण्याची शक्यता आहे. असे असले तरी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.