चाकूच्या धाकाने गटविकास अधिकाऱ्याला (बीडीओं) लुटले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून चोरट्यांनी गटविकास अधिकाऱ्याला (बीडीओं) चाकूने वार करुन लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शहरातील गुलमोह कॉलनीतील माळी थिएटरजवळ शनिवारी (दि.६) पहाटे साडेतीनच्या सुमरास घडली. या घटनेत गटविकास अधिकारी जखमी झाले असून चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला आहे.

आप्पासाहेब रामचंद्र सलगर (वय ५०, रा. स्वप्नशील अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी) असे जखमी झालेल्या बीडीओंचे नाव आहे. त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8df01e97-c984-11e8-a234-552dae799121′]

पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सलगर बीड जिल्ह्यातील आष्टी येथे बीडीओ म्हणून काम करतात. ते कुटुंबांसमवेत गुलमोहर कॉलनीतील स्वप्नशील अपार्टमेंटमध्ये रहातात. औरंगाबाद येथील बैठक संपल्यानंतर शनिवारी पहाटे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ बसमधून उतरले होते.

[amazon_link asins=’B076D7QK9B,B075JLZ1GF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f8b90a4-c984-11e8-b188-d9310b3b7aa9′

तेथून ते चालत घरी निघाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलवरून तोंडाला रूमाल बांधलेले दोन तरूण त्यांच्याजवळ आले. दोघांनीही त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेला ऐवज मागितला. त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर एकाने चाकूने त्यांच्यावर वार केला.नंतर त्यांच्याकडील पाच हजारांची रोकड, गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन, कपडे असलेली बॅग असा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर दोघेही पसार झाले. याबाबत सलगर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी कांबळे खून प्रकरण : संशयीत राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज फरार

दरम्यान, शनिवारी सकाळी सलगर फिर्याद देण्यासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी तेथे एकाने प्रकरण मिटवून घ्या, पैसे परत देतो, फिर्याद देऊ नका असा सल्ला दिला. मात्र याबाबत सलगर यांनी अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला.