पुणे येथील सिंबायोसिस विद्यापीठाचा परिसर ठरला देशात सर्वोत्तम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पुणे येथील सिंबायोसिस विद्यापीठाला स्वच्छ व निरोगी परिसर ठेवण्याकामी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज ‘स्वच्छ कँपस रँकिंग’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विद्यापीठासह राज्यातील अन्य दोन संस्थांनाही यावेळी गौरविण्यात आले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24ca2cd8-c582-11e8-b725-2df122b60961′]

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने आज हॉटेल अशोक येथे ‘स्वच्छ कँपस रँकिंग पुरस्कार-2018’ वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह आणि उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर. सुब्रमण्यम उपस्थित होते. देशातील एकूण 51 उच्च शैक्षणिक संस्थाना परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्याकामी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 8 श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.
[amazon_link asins=’B01N407G2I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6ec12789-c583-11e8-a299-efb91e2c3a55′]

विद्यापीठाच्या (निवासी) श्रेणीमध्ये देशातील एकूण 10 विद्यापीठांना सन्मानित करण्यात आले. यात पुणे येथील सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी विद्यापीठाचा सन्मान करण्यात आला.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ae3e9e6-c582-11e8-b8ea-eddb40b82eaf’]

तांत्रिक संस्था (निवासी) श्रेणी मध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा इंस्टिटयूट ऑफ मेडिकल सायंसेस तथा अभिमत विद्यापीठाला सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत एकूण 10 पुरस्कार प्रदान करण्यात आले व या संस्थेला 5 व्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तांत्रिक महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये देशातील ५ महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. यात नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयाला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार विजेत्या संस्थांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

जाहिरात