Coronavirus : चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात 3493 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 127 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 1 लाख पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांनी एक लाखाचा टप्पा पार केला असून राज्याने कॅनडला देखील मागे टाकले आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या पुढे कोरनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 3493 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


राज्यात गेल्या 24 तासात 3493 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 141 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 127 जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3717 इतकी झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आज 127 रुग्ण दगावले असून यामध्ये सर्वाधिक मृतांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत आज 90, ठाणे 11, कल्याण डोंबिवली 3, वसई विरार, मिरा-भायंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत 3 आणि पुण्यात 12 रुग्ण दगावले आहेत.

गुरुवारी राज्यात 3607 रुग्ण आढळून आले होते. तर आज दुसऱ्या दिवशी 3493 रुग्ण आढळून आले आहेत. राज्याने कॅनडाला देखील मागे टाकले असून कॅनडामध्ये 97 हजार 530 कोरोना बाधित रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या सरकारची चिंता वढवणारी आहे. राज्यात गेल्या 24 तासामध्ये 1718 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत राज्यामध्ये 47 हजार 796 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये 49 हजार 616 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.