वाहतूक पोलिसाला भरधाव कारने उडवले, डोक्याला गंभीर दुखापत

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

बिबेवाडी येथील कोंढवा चाैकात असलेल्या बॅंक आॅफ महाराष्ट्रच्या समोर वाहतूक नियमन करत असताना, भरधाव कार ने वाहतूक पोलिसाला उडवल्याची घटना आज (बुधवार) सकाळी 10.30 वाजता  घडली. बाळासाहेब दगडे असे वाहतूक पोलिसाचे नाव असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96f6cbe6-8fe1-11e8-823f-913f8ecae59b’]

दोन आठवड्यापूर्वी वाकड परिसरात वाहतूक नियमन करत असताना एका अभियंत्याने बेजबाबदरपने वाहतूक पोलिसाच्याच अंगावर गाडी घातली होती आणि आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

दत्तात्रय अरुण जाधव असे कार चालकाचे नाव आहे. कारचालक स्पिफ्ट डिझायर कार ने बिबेवाडी येथील कोंढवा चाैकातून जात होता. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत वेगात गाडी चालवत असताना अचानक कार वरील त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने वाहतूक पोलिसाला जोरदार धडक दिली. कारचालकाचा ट्रॅव्हल्स चा व्यवसाय असून, तो हडपसर या ठिकाणी राहतो. अपघातानंतर पोलिसांनी कार चालकासह गाडी ताब्यात घेतली आहे.