Pune : नगररचना विभागाचे तत्कालीन सहसंचालकाच्या पत्नीला फसवणूक प्रकरणी अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   एसीबीने कारवाई केलेले नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांची पत्नीला पुणे पोलिसांनी फसवणूकप्रकरणात अटक केली. त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संगीता नाझीरकर यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय ४४, रा. बारामती) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार संगीता नाझीरकर, चंद्रकांत गरड, दिलीप कास्टिया, देवेश जैन, रवींद्र जैन, समीर जैन, राजेंद्र ओसवाल, ॠषभ ओसवाल, सय्यद सुलतान इनामदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरटे बांधकाम व्यावसायिक आहेत. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय देखील करतात. सोरटे व त्यांचे नातेवाईक मधुकर भरणे यांनी ओम साई डेव्हलपर्स ही बांधकाम कंपनी सुरू केली होती. धायरीत त्यांनी एका गृहप्रकल्पाचे काम सुरू केले होते. त्यांनी गरड व नाझीरकर यांना या कंपनीत भागीदार करून घेतले. त्यानंतर नाझीरकर व अन्य आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. सोरटे यांचे नुकसान व्हावे आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले होते. सहायक निरीक्षक एस. व्ही. उमरे तपास करत आहेत.

पोलिसांनी संगीता नाझीरकर यांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह््यात वापरलेली बनावट कागदपत्रे जप्त करायची आहेत. नाझीरकर व अन्य आरोपींची बँक खात्यांची तपासणी करायची असल्याने पोलीस कोठडी द्याावी, अशी विनंती सरकारी वकील अ‍ॅड. राजर्षी कदम यांनी केली. न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like