एकतर्फी प्रेमातून तरुणीची फेसबूकवर बदनामी, युवक गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने तरुणी प्रतिसाद देत नसल्याच्या कराणावरुन तरुणीचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून बदनामी केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला. या प्रकरणी पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने एका प्रेमवीराला अटक केली आहे.

नील जॉर्ज (वय-४२ रा. डीजनी पार्क, आझाद नगर, वानवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या प्रेमवीराचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या तरुणीने पुणे सायबर क्राईमकडे तक्रार दिली आहे.
[amazon_link asins=’B079R1JS6K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’953524d2-a878-11e8-bc12-a7951e663839′]

फिर्य़ादी तरुणी आणि आरोपी नील जॉर्ज हे एकाच कंपनीत कामाला आहेत. आरोपी नील हा फिर्यादी तरुणीवर एकतर्फी प्रेम करीत होता. तरुणी ही त्यास प्रतिसाद देत नसल्याने त्याने २०१३ मध्ये तरुणीचे बनावट फेसबूक अकाऊंट तयार केले. तसेच फिर्यादी तरुणीचे रेडीफ मेल आयडीचा अनधिकृतरीत्या अॅक्सेस चोरुन त्यावर असणारे फोटोंचा वापर करुन बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. या फेसबूक अकाऊंटवर फिर्यादी तरुणीचे फोटो टाकून तीची बदनामी केली. तसेच फिर्य़ादी तरुणीच्या मित्राच्या पत्नीला मेसेज पाठवून फिर्य़ादी व त्यांचे पती बाबत गैरसमज निर्माण केला. याची फिर्य़ाद तरुणीने सायबर क्राईम सेलकडे केली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रीक तपास करुन आरोपीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी दरम्यान त्याने आपण तरुणीवर प्रेम करत असल्याचे सांगून ति प्रतीसाद देत नसल्याने हे कृत्य केल्याची कबूली दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मंदा नेवसे, महिला पोलीस शिपाई ज्योती दिवाणे, पोलीस शिपाई भुषण शेलार यांच्या पथकाने केली.
इतर बातम्या-
पुणे : प्रमोशन इव्हेंटच्या सामानाची टोळक्याकडून तोडफोड