पुण्यात मंदिरही सुरक्षीत नाहीत ?, प्रसिद्ध ‘नातूबाग’ गणपती मंदिरात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील साऊंड आणि रोणषणाईसाठी प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पुण्यातील बाजीराव रस्त्यावरी या प्रसिद्ध गणपती मंदिरात देखावा पाहण्यासाठी पुण्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून भावीक येत असतात. चोरट्यांनी याच मंदिरातील दानपेटी लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध नातूबाग गणपती मंडळाच्या मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी लंपास केली. बुधवारी सकाळी मंडळाचे कार्य़कर्ते मंदिरात गेले होते. त्यावेळी मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. मंदिर परिसरात आणि मंदिरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मंदिराचे कुलूप पहाटे तीनच्या सुमारास तोडून मंदिरात प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरात जाऊन दानपेटी उटलून बाहेर आणली. त्यानंतर दुचाकीवरून पळवून नेली. या दान पेटीत १० हजार रुपयांची रोकड होती.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. मागील एक वर्षापासून ही दानपेटी उघडण्यात आली नव्हती. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर मंदिरातील दानपेटी उघडण्यात येते. यामध्ये जमा झालेली रक्कम गणेशोत्सवात वापरली जाते. मात्र, चोरट्यांनी दानपेटी उघडण्याची संधी दिली नाही, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय

You might also like