पेडकाई देवी मंदिरातील दानपेटी फोडून हजारोंची रक्कम लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पेडकादेवी मंदिर गाभाऱ्यातील दानपेटी फोडून हजारो रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या रस्त्यालगत डोंगरावर पेडकाई देवी मंदिर आहे. मंगळवारी मध्यराञी चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश करत गाभाऱ्यातील दान पेटी फोडून अंदाजे 6 ते 7 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिरात राञी चोरट्यांनी लाईट बंद करुन दानपेटी फोडली. सकाळी ही बाब पुजारीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीसांना चोरीची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मंदिर परिसरात पहाणी केली. तपासकामी मदतीसाठी फिंगरप्रिंट तज्ञ, श्वान पथकांची मदत घेण्यात आली.

मंदिर परिसरात सर्वञ सिसीटिव्ही कँमेरे लावलेले आहे. परंतु लाईट बंद केल्याने याचा फायदा झाला नाही. पोलीस पुढील तपास करत आहे.

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक