धुळे : ठाण्यातील प्रवाशाच्या लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदखेडा-जळगाव बसने प्रवास करताना चोरट्यांनी प्रवाशाचे लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी अनिल बळीराम पाटील (वय 39, रा. हरीओम पुजा हौ.सोसायटी गरीबवाडा डोबवली वेस्ट, जि. ठाणे) यांनी नरढाणा पोलीस ठाण्यात दागिने चोरीची तक्रार दाखल केली आहे.

सध्या लग्न सराईला सुरूवात झाली आहे. लग्न कार्यात सहभागी होण्याकरीता अनिल पाटील हे नरढाणा ते बेटावद दरम्यान शिंदखेडा-जळगाव बस ने प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान चोरट्यांनी त्यांचे जवळील बॅगेतील 1 लाख 96 हजार रुपये किमतीचे सोन्यांचे दागिने लंपास केले. बेटावद गावाजवळ आल्यावर चोरी झाल्याचे अनिल पाटील यांच्या लक्षात आले. बस चालकाने बस नरढाणा पोलीस ठाण्यात आणली. पोलीसांनी बसची व प्रवाशांच्या साहित्याची तपासणी केली. मात्र दागिने सापडले नाही. यामुळे नागरीकांना काही वेळ त्रास झाला. नंतर पुढील प्रवास करता नागरीकांसह बस रवाना करण्यात आली.

अनिल पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार नरढाणा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. पाटील करत आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like