मळगंगा देवी मंदिरातील चाेरी : पाेलिसांनी ‘त्या’ चाेरट्यांना ठाेकल्या अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या

नगर : पाेलीसनामा ऑनलाईन

पारनेर तालुक्‍यातील निघोज येथील प्रसिध्द मळगंगा देवी मंदिरात मध्यरात्री दोन दानपेट्या फोडून, सोने, चांदीचे दागिने अशा एकूण चार लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला हाेता. या चाेरिचा तपास नगर पाेलिसांनी सापळा रचून अवघ्या 12 तासाच्या आत लावाला आहे. याप्रकरणी पाच जणांना नगर पाेलिसांनी ताब्यात घेतले असून आराेपींमध्ये एका सराफ दुकानदाराचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02f5adaf-aebc-11e8-87bb-bd74b78cf745′]

सखारपाम गावडे(19),रमेश उर्फ बाळू पडवळ (22), भास्कर पठवे ( 40) आणि राहुल उर्फ भाऊसाहेब निळे (27) या चोरट्यांसह सराफ दुकानदार सोनार प्रशांत भुजबंद (35)सह एकुण 5 आरोपींना नगर पाेलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री मळगंगा देवी मंदिराचा दरवाजा ताेडून दाेन दानपेट्या फाेडून साेने, चांदीचे दागिने अशा एकूण चार लाख चाळीस हजार रुपयांचा एेवज चाेरट्यांनी चाेरला हाेता. विशेष म्हणजे देवीचे मंदिर मुख्यपठेत असून हाकेच्या अंतरावर पाेलिस दूरक्षेत्र आहे. मंदिराचे पुजारी सकाळी पुजेकरीता निघाले असता त्यांच्या घराच्या कड्या बाहेरुन लावलेल्या हाेत्या तेव्हा पुजारी खिडकीतून बाहेर आले. त्यावेळी त्यांना चाेरी झाल्याचे लक्षात आले. चाेरट्यांनी देवीचा ८ ते १० किलाेचा चांदीचे दाेन मुखवटे, छत्री, एक किलाे वजनाचा चांदीचा घाेडा, साेन्याची नथ व इतर दागिन्यासह दानपेटीतील राेख रक्कम लंपास केली हाेती.

अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा सर्व ऐवज आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सिने अभिनेत्रीशी लगट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिनेत्याला अटक