सानिया मिर्झाचं पतीबद्दल ‘वादग्रस्त’ वक्तव्य, सोशलवर ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या खेळापेक्षा जास्त आपल्या अजब गजब वक्तव्यांनी चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी युवराज सिंग बद्दल वक्यव्य केल्यानंतर आता तिने तिचा पती आणि पकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल होत आहे. असे असले तरी तिचे म्हणणे आहे की ती या सर्व गोष्टींना वैतागली असून दुसऱ्यांनी एखादी गोष्ट केली तर त्यांचे कौतूक होते मात्र मला ट्रोल केले जाते.

महिलांच्या टी – 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा 95 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने 5व्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. एलिसा हिलीने या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विश्वविक्रम रचला. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकात अंतित सामन्यात कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

हिलीने यावेळी 39 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांसह 75 धावा रचल्या. हा सामना पाहण्यासाठी एलिसाचा नवरा आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आला होता. सामन्यानंतर एलिसा आणि मिचेल यांनी मैदानात एकमेकांची भेट घेतली. या भेटीवर आयसीसीने त्यांचे कौतूक केले. यामुळे सानिया वैतागली आणि तिने आपली निराशा ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

सानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणाली, जर ही गोष्ट आशिया खंडात झाली असती तर त्या पुरुष क्रिकेटपटूला लोकांनी ‘जोरु का गुलाम’ ठरवले असते. या साऱ्या ट्विटमधून सानियाला आपल्याबद्दलही सांगायचे होते. जर सानियाचा सामना पाहायला शोऐब गेला असता आणि तिला भेटला असता तर लोकांनी त्याला ‘जोरु का गुलाम’ म्हणत ट्रोल केले असते, असे सानियाला म्हणायचे होते असे चाहत्यांना वाटत आहे.