‘महायुती’ अजूनही सरकार स्थापन करू शकते : नितीन गडकरी

मुंबई : पोलीसनामा ऑानलाइन – देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालाकडे आपला राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेवर टीका केली आणि स्पष्ट केले की अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावर चर्चा झाली नव्हती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील हेच स्पष्ट केले की अमित शहांसोबत अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची कोणतीही चर्चा झाली नव्हती, परंतू अजूनही युती सरकार स्थापन करु शकते. भाजप शिवसेना युती हिंदूत्वाच्या मुद्यावर आहे, ही सर्वात जास्त काळ टिकलेली युती आहे. ती टिकवायची की नाही ते त्यांनी ठरवावे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की शिवसेनेबरोबर आमची मुख्यमंत्रिपद वाटपाबाबात कोणतीही बातचीत झालेली नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते.

नितिन गडकरी यांनी सांगितले की आम्ही शिवसेनेसह युतीत निवडणूका लढल्या आहेत. बाळासाहेब असताना देखील मुख्यमंत्रिपदावर रस्सीखेच झाली होती. तेव्हा आम्ही निश्चित केले होते की ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल.

गडकरी म्हणाले की आमदारांच्या खरेदीबाबत केले जात असलेले आरोप खोटे आहेत. आम्ही आमदार फोडाफोडीच्या भूमिकेचे नाहीत. शिवसेनेला सकारात्मक विचार केला पाहिजे. राज्यातील जनतेच्या हितार्थ निर्णय घेतले पाहिजेत. त्यांनी हे ही स्पष्ट केले की सरकार बनवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांची कोणतीही भूमिका नाही.

Visit : Policenama.com 

 

You might also like