पंकजा यांच्यासमोर वाचलेल्या ‘त्या’ पत्राची धनंजय मुडेंनी घेतली दखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोन भाजप (BJP) नेते आणि एक राष्ट्रवादीचे (NCP) रोहित पवार (Rohit Pawar) अशी बैठक जमली होती. या कार्यक्रमात राजकीय विनोदाच्या जुगलबंदी नंतर कार्यक्रमाचा शेवट अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी लिहीलेल्या पत्राने झाला. हे पत्र सागर कारंडे (Sagar karande) याने वाचले आणि उपस्थितांच्या डोळ्यात पाळी आले. हे पत्र होते ऊसतोड कमागारांची आयुष्याची व्यथा मांडणारे होते.

राज्यातील ऊसतोड कामागारांच्या आयुष्यातील व्यथा या पत्रातून मांडण्यात आल्या होत्या. यावेळी ऊसतोड कामगारांच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यावेळी उपस्थित असलेले सर्वजण भावूक झाल्याचं दिसून आलं. आता याच पत्राची दखल सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घेतली आहे.

या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी विविध राजकीय विनोदानंतर कार्यक्रमाचा शेवट भावूक वातावरणात पार पडला. शेवटच्या क्षणी ऊसतोड कामगार, त्यांची मुलं आणि त्यांचे भविष्य या संदर्भात लिहिलेलं पत्र या नेत्यांसमोर सागर कारंडे यांनी वाचले आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी लेखक अरविंद जगताप यांना एक पत्र लिहलं आहे. त्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या संदर्भातील पत्र वाचून अंगावर काटा आला, माझे वडीलही ऊसतोड कामगार होते, असे मुंडे यांनी सांगितले.

मुंडे पत्रात पुढे लिहितात, काबाडकष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या लेकरांच्या नशिबी हीच पाचाट आणि कोयता घ्यावा लागतो. त्यांचं हेच भविष्य सुधारण्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभारलेले महामंडळ आता मी आपल्या खात्यात मागून घेतलं आहे. राबणाऱ्या आपल्या या आया, बहिणींसाठी एक विशेष योजना आखायची असल्याची असून कामगारांना हक्काचं काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेसारखी काम हाती घेण्याचा प्रयत्न असल्याचे धनंजय मुंडेंनी उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.