महापाैरांसह अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार नाही : रावसाहेब दानवे 

 पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे महानगरपालिकेतील महापाैरांसह अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार नसून त्यांना दिलेला कार्यकाळ ते पूर्ण करतील. अशी भूमिका भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित आमदाराच्या बैठकीनंतर मांडली. रावसाहेब दानवे यांच्या भूमिकेमुळे महापौरासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या बदलांच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da431815-7bb4-11e8-9f4e-3d3a57a4d656′]

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत १६२ पैकी ९८ भाजपचे उमेव्दार निवडून आल्याने त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली.त्यावेळी महापौर पदाच्या शर्यतीमध्ये अनेक नगरसेविका होत्या .मात्र त्यात मुक्ता टिळक यांचा अनुभव लक्षात घेता.पक्षाने त्यांना महापौर पदाची संधी दिली. त्यांच्या कार्यकाळास सव्वा वर्षांचा कालावधी झाल्याने मागील महिन्याभरापासून महापौर आणि सभागृह नेते बदलांच्या चर्चेला उधाण आले होते. त्या दृष्टीने काही नगरसेवकांनी पक्ष श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यास देखील सुरुवात केली होती. त्यामुळे या महिन्याअखेर पर्यंत महापौर मुक्ता टिळक यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी मिळेल अशी चर्चा सुरु असताना.आज पुण्यात भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर बंगल्यावर शहरातील सर्व आमदाराची दोन तास बैठक झाली.

महापौर आणि अन्य पदाधिकायामध्ये बदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. असा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारला असतात.ते म्हणाले की,मी पुण्यातील विशेष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलो असून पुण्यात संघटनेचे चांगले काम पाहण्यास मिळत आहे. त्यांच्या कामावर मी खूश आहे. तर कोणत्याही पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार नसून त्यांना दिलेला कार्यकाळ ते पूर्ण करतील. अशी भूमिका दानवे यांनी मांडली.