‘या’पुढे राष्ट्रवादीच्या सभेत दिसणार 2 झेंडे, अजित पवारांची घोषणा

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – आदिलशाही, अकबर आणि टिपू सुलतान यांची राज्य होती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य असे कुणी म्हटलं होतं का ? असा सवाल करत त्यांच्या काळात रयतेचं राज्य असे म्हटले जात होते. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सभेत दोन झेंडे राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या सभेमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि ‘राष्ट्रवादीचा झेंडा’ लावण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी पाथरीच्या सभेत केली.

पाथरी येथे झालेल्या सभेमध्ये अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाही. देवेंद्र फडणवीस कधी देणार हमीभाव ? कशाला शेतकऱ्यांना फसवताय असा संतप्त सवाल त्यांनी जाहीर सभेत केला. मराठवाड्यामध्ये पाच वर्षात शेतीसाठी या सरकारकडून काय मिळाले असा सवाल देखील उपस्थित करून लोकसभेत दगाफटका झाला आतातरी सावध रहा असे आवाहन त्यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस असा टोला लगावताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे योग्य नसल्याची टीका सरकारवर केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like