सकाळी उठल्यानंतर ‘या’ 10 चूका केल्यास कधीच राहणार नाही तुम्ही निरोगी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ऑफिसमधील कामाचा ताण असो की घरातील टेन्शन. जर तुमचे मॉर्निंग रुटीन योग्य असेल तर तुम्हाला दिवसभरातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण असे असले तरीही अनेक लोक झोप पूर्ण झाल्यानंतर काही चुका करण्यास सुरुवात करतात. हे असे करणे तुम्हाला आरोग्यदायी ठेवणार नाही.

स्लिपिंग पॅटर्न – जर तुम्हाला वाटत असेल की सकाळची 15 मिनिटांची एक्स्ट्रा झोप तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जीने भरेल, तर ही अत्यंत मोठी चूक आहे. योग्यवेळात झोपणे आणि उठण्याची सवय तुम्हाला ऍक्टिव्ह राहण्यासाठी मदत करते.

डार्क रुम – तुम्ही सकाळच्यावेळी डार्क रुममध्ये राहण्याची इच्छा बाळगत असाल तर ती तुमची मोठी चूक असू शकते. दिवसाचा प्रकाश हा फक्त झोपेसाठी गरजेचा नाही पण शरीरातील इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशनपासून लढण्यासाठी मदत करतो. याशिवाय शरीरातील नॅचुरल व्हिटॅमिन-डीही मिळू शकतील.

रेग्युलर बेडटाईम शेड्युल – अनेकदा लोकांना उशिरा झोपण्याची सवय असते. मात्र, तुमचा ‘रेग्युलर बेडटाईम शेड्युल’ नियोजित असल्यास तुम्हाला चांगली झोप लागू शकते.

लो ब्लड प्रेशर – जेव्हा झोप पूर्ण झाल्यानंतर उठता आणि बिछान्यातून उठून उभे राहता तेव्हा रक्तप्रवाह पायांच्या बाजूने होतो. त्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर अचानकपणे खाली जाण्याची शक्यता आहे.

रेग्युलर वर्कआऊट – रेग्युलर वर्कआऊटपासून तुमचा स्लिपिंग पॅटर्न, ह्रदयाचे आरोग्य आणि मेंदू सर्व सुदृढ राहते. हे दिवसभराच्या खाण्या-पिण्यात संतुलन ठेऊन वजनही नियंत्रित करते.

कॉफी – जर आपण साधारणपणे सकाळी कॉफी पित असाल तर ते अचानक सोडणे तुम्हाला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे फक्त तुमची एकाग्रता भंग होत नाही तर डोकेदुखी, फ्यूसारख्या अडचणी वाढू शकतील.

जास्त गोड पदार्थ – पांढऱ्या रंगाच्या पिठातून बनविलेल्या शुगर पेस्ट्रीमध्ये खूपच कमी मात्रामध्ये न्युट्रिशन असते. त्यामुळे चिडचिडपणा, थकवा वाटणे आणि भूक वाढणे अशा गोष्टी होऊ शकतात. तसेच अंड्यातील प्रोटिनमुळे तुमची भूक शांत होण्यास मदत मिळू शकते.

दरम्यान, मेडिटेशन केल्यानेही तुमच्या मेंदूला मोठा फायदा होऊ शकतो.