मासिक पाळीत ‘हा’ त्रास जाणवल्यावर डॉक्टरांकडे जावे

पोलीसनामा ऑनलाइन – मासिक पाळी मेंस्ट्रुअल क्रॅम्स, मूड स्विंग्स, ब्लोटिंग आणि पिंपल्स सारख्या त्रासाला महिलांना सामोरे जावे लागते. काहींना या दिवसांत प्रचंड वेदनाही होतात. प्रत्येकीला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कमी ब्लिडींग, जास्त ब्लिडींग, अनियमित मासिक पाळी, पोट आणि कंबरदुखीच्या प्रचंड वेदना, असा त्रास होत असतो. अनेकदा इतर समस्यांमुळेही हा त्रास होतो.

७० टक्के महिलांना मासिक पाळीत एब्डोमिनल पेन, क्रॅम्प्स आणि ब्लोटिंगचा त्रास होतो. प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाशयातील मांसपेशीतून रक्तस्त्राव होत असल्याने या वेदना होतात. अशाप्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मासिकपाळीतरन वेदना एंडोमेट्रियोसिस, वजायनल स्कॅरींग किंवा फायब्रॉएड्सची लक्षणे असू शकतात. मासिक पाळीत ब्लडींगचा रंग लाल असणे सामान्य आहे. परंतु जर तो पुसट लाल किंवा काळपट असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

जर पिरियड्सचा रंग स्ट्रॉबेरी जॅमप्रमाणे असेल तर शरीरामध्ये एस्ट्रोजेनचा स्तर कमी असल्याचा हा संकेत आहे. ही वजायनल ड्रायनेस, थकवा, लो लिबिजो आणि केस गळण्याच्या समस्या होऊ शकतात. गरोदरपणाशिवाय जर मासिक पाळी अनियमित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे थायरॉइड किंवा हार्मोनल असंतुलनचे लक्षण असू शकते. यामुळे अंडाशयामध्ये अल्सर होण्याची शक्यता असते. कधी-कधी हे जास्त तणावामुळेही होते. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे सामान्य असहे. परंतु जर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही जास्त रक्तस्राव होत असेल आणि ३ ते ४ तासांमध्ये पॅड चेंज करावा लागत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे हीमोफीलिया, हार्मोनल असंतुलन, फायब्रॉएड्स किंवा ब्रेन ट्यूमरची असू शकतात.