थेऊरमध्ये कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या वाढतेय

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन  –   येथील कोरोना संक्रमणामुळे गंभीर परिस्थिती समोर आली असून आज रविवारी संपलेल्या चोवीस तासात तब्बल 14 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कोरोना संसर्गाने हवेलीतील भयंकर परिस्थिती निर्माण केली असून दररोज मोठे आकडे बाहेर येत आहेत.थेऊर या तिर्थक्षेत्री गेली अनेक महिने परिस्थिती नियंत्रणात होती परंतु गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी आपला संयम सोडल्याने नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत गेल्या चोवीस तासात तब्बल चौदा नवीन रुग्णांची भर पडल्याने एकुण रुग्ण संख्या 75 च्या वर पोहोचली आहे.यातील 36 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर 5 जण कोरोनामुळे मृत्यु पावले आहेत.

ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात असल्याने आता यावर नियंत्रण आणण्यासाठी कसे व कोण प्रयत्न करणार हे गुलदस्त्यातच आहे कारण आणखी प्रशासकांनी चार्ज घेतलेला नाही. सध्या आरोग्य यंत्रणेसह महसूल विभाग यांना कामासाठी कसरत करावी लागणार आहे.

कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी याबाबत माहिती दिली आहे की थेऊरमध्ये सध्या अ‍ॅक्टीव रुग्णाची संख्या दिवसा गणिक वाढताना दिसत आहे त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.