लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून वेअरहाऊसमध्ये चोरी करणारा गजाआड

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत कटकेवाडी येथील सिस्का LED लाईट वेअरहाऊसमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावण्यात लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण विभागाला यश आले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हिरामण शांताराम पवार (वय 29 वर्ष, रा. पाटीलवस्ती, केसनंद, पणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 07/12/2019 रोजी मुस्तकीन शब्बीर शेख (वय 37 वर्षे, रा. पुणे कॅम्प, पुणे) यांनी ते काम करीत असलेल्या कटकेवाडी, लोणीकंद येथील सिस्का LED लाईटचे वेअर हाऊसमध्ये चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. चोरट्यांनी स्टोअर रुमचा दरवाजाचा तोडून इस्त्री, ट्यूबलाईट्स, बल्प, एक्स्टेन्शन बोर्ड, ट्रीमर, LED लाईट्स असा एकूण 1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ या ठिकाणी भेट दिली. घडला प्रकार समजून घेत गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दि. 07/12/2019 रोजी वाघोली गावचे हद्दीत हे पथक गस्त घालत असताना सिस्का LED कंपनीतील कामगारांच्या मदतीने एका संशयित इसमास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलीस स्टेशनला आणून कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव हिरामण शांताराम पवार (वय 29 वर्षे, रा. पाटीलवस्ती, केसनंद, पुणे) असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याबाबत कबुली दिली.

आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले इस्त्री, ट्यूबलाईट्स, बल्प, एक्सेटेन्शन बोर्ड, ट्रीमर, LED लाईट्स असा एकून 1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 04 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, राजेश माने, समीर पिलाने, ऋषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक राजेश माने करीत आहेत.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like