‘ही’ अभिनेत्री इंदिरा गांधींवरील वेब सीरिजवरमध्ये काम करण्याची संधी मिळवण्याच्या प्रयत्नात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावर वेब सीरिज येणार आहे. दरम्यान यात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन हिला या वेब सीरिजमध्ये काम करायचे आहे तशी इच्छा विद्याने व्यक्त केली आहे. देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारीत वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळवण्याच्या प्रयत्नात मी आहे असे विद्या बालन हिने सांगितले आहे. मुंबईत मंगळवारी एका कार्यक्रमात ती बोलत होती. त्यावेळी तिने ही इच्छा बोलून दाखवली आहे.

यावेळी बोलताना विद्या म्हणाली की, “मी इंदिरा गांधींच्या जीवनावर आधारीत वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळवण्याच्या सध्या मी प्रयत्न करीत आहे. पुढे काय होते ते पाहूयात. मी असं अनुभव करत आहे की, एखाद्या वेब सीरिजशी जुळल्यावर खूप काम करावं लागतं. एका चित्रपटाच्या तुलनेत वेब सीरिजमध्ये काम करताना बरेच लोक स्वत:शी कनेक्ट करतात. त्यामुळे यात खूप वेळ देखील लागतो.” असेही विद्या म्हणाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ रॉय कपूर हे या वेब सीरिजचे निर्माण करत आहेत असेही समजत आहे. विद्याला या वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा आहे. ती यात काम मिळण्यासाठी तसे प्रयत्न करत आहे. दरम्यान तिला यात काम करण्याची संधी मिळते का याची चाहते वाट पाहत आहेत. तिचे चाहतेही तिच्यासाठी खूप उत्सुक असल्याचं समजत आहे.

You might also like