सकाळी उठल्याबरोबर थकल्यासारखे वाटतं तर दिवसाची सुरुवात ‘या’ घरगुती पेयाने करा, जाणून घ्या

व्यस्त जीवनशैलीमुळे ते आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, प्रतिकारशक्ती(immunity) कमकुवत झाल्यामुळे शरीराला लवकरच थकवा व अशक्तपणा जाणवू लागतो. कामाबरोबरच आरोग्या(health)ची काळजी घेणेही खूप महत्वाचे आहे. यासाठी आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपण निरोगी आहाराचे पालन न केल्यास थकवा, केस गळती आणि हिमोग्लोबिन कमी सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, आपण बीट,गाजर आणि डाळिंब, पौष्टिक गुणधर्मांनी भरलेले पेय बनवून घरी खाऊ शकता.

कसे करावे:
साहित्य:
बीट – १
गाजर – १
डाळिंब – १
कढीपत्ता पाने ७_८
आले तुकडा १
लिंबू – अर्धा
कोथिंबीर
पुदीना पाने

कृती: १.
_सर्व साहित्य मिक्सरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून बारीक करा.
_त्यानंतर, मिक्सरमधून काढून एका काचेच्या ग्लास मध्ये टाका.
_वर लिंबाचा रस घालून प्या.
_दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

फायदे:
गाजर, डाळिंब आणि बीटापासून बनविलेला रस शरीरातील मेटाबॉलिक दर सुधारित करते. हे रक्त स्वच्छ करण्यास देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे त्वचा चमकते. याशिवाय हा रस पिल्याने शरीरात हिमोग्लोबिन वाढते आणि रक्तातील साखरही नियंत्रणात असते. वजन कमी करण्यासाठी आणि सुरकुत्यापासून मुक्त होण्यासाठी हा रस खूप फायदेशीर आहे.