ही ‘नाइट लाइफ’ नसून ‘किलिंग’ नाईट, ‘भाजप’ नेत्याची आदित्य ठाकरेंच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’वर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने शाळेत संविधान पठनाचा वाचनाचा निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया भाजपमधून येत आहे. भाजप नेते अशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शाळेत संविधान पठन, दिल्ली निवडणूकांदरम्यान व्हायरल व्हिडिओ, नाईट लाईफ या सर्व विषयांवर भाष्य केले.

भाजप नेते अशिष शेलार म्हणाले की भाजपने संविधान दिन सुरु केला. शाळेत संविधान वाचनासंबंधित राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत आहे, राज्य सरकारचा हा देर आए दुरुस्त आए असे प्रकार आहे.

नाईट लाईफ या आदित्य ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टवर बोलताना अशिष शेलारांनी शंका उपस्थित केल्या. ते म्हणाले की ही नाईट लाईफ नसून किलिंग नाईट आहे. नाईट लाईफच्या आडून भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत त्यांनी नाईट लाईफ मागे खरे निकष काय असा प्रश्न शिवसेनेला विचारला.

दिल्ली निवडणूकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज्यांचा आणि तान्हाजींचा व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या घटनेवर बोलताना शेलार म्हणाले की हा भाजप आणि संघ परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. भाजपवर, संघावर हल्ला करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. वैचारिक युद्धात जनतेने भाजपला पाठिंबा दिला, हा आभास निर्माण करणाऱ्यांना जनता नाकारेल आणि भाजपला पाठिंबा देईल.

फेसबुक पेज लाईक करा –