‘हे’ आहे कॅटरीना कैफ आणि माझ्यातील नाते : मोहम्मद कैफचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ईदच्या मुहूर्तावर भारत हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात कॅटरीना कैफ सलमान सोबत मुख्य भूमिकेत झळकली आहे. प्रेक्षकांना या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सलमानने या या प्रेमाबद्दल ट्विट करत चाहत्यांचे आभारही मानले आहेत. सलमान आणि कॅटने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी खूपच मेहनत घेतली होती.

भारतच्या प्रमोशनदरम्यान सलमान आणि कॅट भारतीय माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण यांची भेटही घेतली होती. मोहम्मद कैफ आणि कॅटरीना कैफ यांच्यात काही नाते आहे का अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असते. यानंतर आता त्यांच्यात काही नाते आहे का याचा खुलासा आता झाला आहे. खुद्द मोहम्मद कैफने याचा खुलासा केला आहे.

मोहम्मद कैफने ट्विटरवरून एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. हा फोटो मोहम्मद कैफ आणि कॅटचा आहे. एक मजेदार पोस्ट लिह मोहम्मदने त्यांच्यातील नात्याचा खुलासा केला आहे. आपल्या पोस्टमध्ये कैफ म्हणतो की, “शेवटी कैफ भेटले. आमच्या अद्याप तरी माणूसकी शिवाय दुसरे कोणतेही नाते नाही.”

कैफने नात्याचा खुलासा केला तरी नेटीझन्स शांत बसल्याचे दिसत नाही. सोशलवर या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, अद्याप तरी काहीच नाही असे म्हणत मोहम्मदने कॅटरीना सोबत फ्लर्ट करत आहे. तर आणखी एकाने म्हटले आहे की, तुमच्यात काहीच नाते नाही असे तू कसे म्हणू शकतोस. आपण सगळे भारतीय असून एकमेकांचे बांधव आहोत हे तू विसरला आहेस का.