राहुल गांधी नांदेड मधून लढणार, फुस्की ठरली बातमी ? त्या बहाद्दराचा दावा खोटा !

विष्णू बुरगे  : पोलीसनामा ऑनलाईन –  राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढतील अशा चर्चांना एक दिवस उधाण आलं होतं. अनेकांनी त्या पद्धतीची रिपोर्टिंग सुद्धा केली आणि राहुल गांधी या ठिकाणी लढणार असं संगण्यात आले, अशी माहिती मिळाली मात्र फक्त एक दिवस मारून नेण्याची पद्धत कशी असते फेक एन्टरटेन्मेंट कसं करतात हे सिद्ध झालं आहे. काँग्रेसला नांदेडमधून सहजपणे निवडून येता येईल यापेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

राहुल गांधी या ठिकाणाहून निवडणूक लढतील असा कयास बांधला गेला. त्यासाठी सूत्र दिल्लीतून माहिती देत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यावर आठवडाभर चर्चा झाली. अनेकांनी आपल्या बुद्धीचं पाणी उलटवलं. मात्र तसं काही झालं नाही. नांदेडमधून कोण निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरी अशोक चव्हाण हेच पुढचे उमेदवार असतील असं काँग्रेसच्यावतीने सांगण्यात येत आहे. एका बहद्दर व्यक्तीने ही अफवा सोडली आणि दोन-तीन दिवस त्याच्यावर चर्चा झाली.

महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातून दोनच खासदार निवडून गेले त्यामध्ये नांदेड वरून अशोक चव्हाण आणि हिंगोलीमधून राजू सातव. या दोन्ही भागांमध्ये दलित आणि आदिवासी बहुल क्षेत्र असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे मोदी लाट असताना सुद्धा या दोन्ही सीट काँग्रेसला आपल्याकडे ठेवण्यात  यश आलं होतं. चव्हाण यांचा डोळा खासदारकीवर नसून पुढे होणाऱ्या आमदारकी मिळवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न असल्याचे चित्र त्यावेळी रंगवण्यात आलं. त्यामुळे ही जागा राहुल गांधी लढवतील असा फार्स करण्यात आला.

मात्र दिल्लीतून दिलेल्या सूत्रांनी जो दावा होता तो दावा दिल्लीचा होता की त्या बहाद्दराचा स्वतः एका व्यक्तीचा होता हे मात्र सांगता येणार नाही.  राहुल गांधी यांनी जर नांदेडची सीट लढवली त्याचा फायदा मराठवाड्यातील शेजारील जागांना  होईल अशी आशाही त्यावेळेस व्यक्त केली होती. मात्र ते सर्व दावे आता चुकीचे ठरताना दिसत आहेत. कारण आता तरी राहुल गांधी या ठिकाणी पोलीस नामाशी बोलताना स्वता अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं की ही अफवा होती फक्त चर्चा होती त्या पलीकडे काही नाही.