मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्यास ‘या’ मोठ्या पक्षाचा उमेदवार ठरला ?

लखनऊ : उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी यांचा विजयी रथ रोखण्यासाठी वाराणसी मतदारसंघातील समाजवादी पक्षाच्या उमेदवाराबद्दल चर्चा सुरु आहे. वाराणसीत पटेल मतदारांचा टक्का मोठा आहे. त्या मतदारांना प्रलोभित करण्यासाठी समाजवादी पार्टीने सुरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अपना दलाचे या पटेल मतदारांवर पकड आहे त्यामुळे मोदींच्या विजयाचे लक्ष भेदण्याची क्षमता समाजवादीच्या उमेदवारात नसणारच आहे.

सुरेंद्र पटेल हे अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिलेले सुरेंद्र पटेल हे मोदींना कित्पद टक्कर देतील हे पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच सपाचे नेते अखिलेश यादव यांना बनिया किंवा जायसवाल समाजाच्या नेत्याला वाराणसीतून उमेदवारी देण्यात यावी असा सल्ला देण्यात आला होता. तसेच राष्ट्रीय जनवादी पार्टीचे अध्यक्ष संजय चौहान यांचे देखील नाव मोदींच्या विरोधात उमेदवारी करण्यास सुचवण्यात आले होते.

सपा आणि बसपा यांच्यात मतदारसंघाची वाटणी होताना वाराणसीच्या जागेवर सपा उमेदवार देणार हे निश्चित करण्यात आले होते. सुरेंद्र पटेल यांच्या नावावर अधिकृत मान्यता देण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले नाही. मात्र सुरेंद्र पटेल यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे.