निवडणुकांसाठीच एअर स्ट्राइक ; काश्मीरच्या ‘या’ माजी मुख्यमंत्रांचा आरोप

श्रीनगर : वृत्तसंस्था – निवडणुका जवळ आल्यामुळेच बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्याचा गंभीर आरोप जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. फारूक अब्दुल्ला यांनी निवडणुका आणि एअर स्ट्राइकवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अब्दुल्ला यांनी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याचा निवडणुकीशी संबंध जोडला. एअर स्ट्राइकबाबत बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, ‘पाकिस्तानबरोबर छोटे युद्ध होईल, याची आम्हाला माहिती होती. मात्र निवडणुका जवळ असल्यामुळे एअर स्ट्राइक करण्यात आले. आम्ही कोट्यवधी रुपयांचे एअरक्राफ्ट गमावले. यात आम्ही कोट्यवधी रुपये किंमतीचं एक लढाऊ विमान गमावलं. नशिबाने पायलट वाचले आणि सुखरुप परतले.’

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक का नाही?

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक न घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी तयार असताना तसा निर्णय का घेतला जात नाही,’ असा सवाल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत समितीच्या निवडणुका अलीकडंच शांततेत पार पडल्या आहेत. राज्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण आहे, असं निवडणूक आयोगाला वाटतं तर मग विधानसभा निवडणूकच का होऊ शकत नाही,’ असेही अब्दुल्ला म्हणाले आहेत.

पुलवामा हल्ल्यासंबंधी अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य –

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले होते. या संदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी या दहशदवादी हल्यात फक्त पाकिस्तान जबाबदार नाही असे वादग्रस्त विधान केले होते.


ह्याहि बातम्या वाचा

काकू, राफेलची फाईल हरवली आहे, कुठे मिळते का बघा ? ठाण्यात पोस्टरबाजी

सैन्य भरतीला आलेल्या युवकाकडे सापडली २ ग्रेनेड

युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

पूर्ण रमजानच्या महिन्यात मतदान थांबवणे शक्य नाही : निवडणूक आयोग

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊच शकत नाही ‘या’ नेत्याचे वक्तव्य