हा ‘ट्रेलर’…’पिक्चर’ अभी बाकी है… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सरपंचाचे मानधन आता तीन पटींनी वाढविले आहे. हा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. ग्रामपंचायत सदस्यांचा मिटिंग भत्ता वाढविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शिर्डी येथे बोलताना सांगितले.

शिर्डी येथे सरपंच व उपसरपंच परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा..राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागाच्या विकासाचे मंथन एकत्रितरित्या होत आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात गावात मूलभूत गरजा देता आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकासाचे नवे मॉडेल देशासमोर ठेवले आहे.

अडीच हजार गावे केली आदर्श
महाराष्ट्रातल्या सरपंचांनी सुमारे अडीच हजार गावे आदर्श केली. सरपंचांना संरक्षण देण्यासाठी थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेतला आहे. सुशिक्षित सरपंच नव्या कल्पना घेऊन पुढे येऊ लागले. महिला पुढे येत आहेत. गावातील मुलांना पुढे नेण्याचे काम महिला सरपंच करीत आहेत. ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करू. शेतीच्या माध्यमातून प्रगती, ठिबकसाठी 80 टक्के अनुदानाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहोत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like