Video : क्लबमध्ये ‘दिलबर’ गाण्यावर थिरकली नोरा फतेही !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटोंमुळंही नोरा चर्चेत येत असते. सध्या नोराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. यात नोराचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. एका क्लबमध्ये नोरा थिरकताना दिसत आहे.

क्लबमध्ये दिलबर गाण्यावर थिरकली नोरा

नोराचा जो व्हिडिओ समोर आला आहे. त्यात नोरा दिलबर (Dilbar) गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हे नोराचं ते गाणं आहे ज्यानंतर काहींनी तिला दिलबर गर्ल (Dilbar Girl) म्हणून बोलवायला सुरुवात केली होती. व्हिडिओत दिसत आहे की, नोरा क्लबमध्ये आहे. तिच्या हातात एक ग्लासही दिसत आहे. खास एक्सप्रेशन देत नोरा काही स्टेप्स करताना दिसत आहे.

नोराचा हा डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या नोराडा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते.