गायब झाली दहशत, देशात या शहरात हजारो युवकांनी केली ‘गो कोरोना गो’ पार्टी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जगभरात कोरोना साथीने प्रचंड खळबळ माजवली आहे. त्याच वेळी, कोरोना टाळण्यासाठी लोकांनी मास्क घालणे, सॅनिटायझर यासारख्या गोष्टी अवलंबविल्या आहेत, परंतु असे दिसते की भारतीय लोकांमध्ये कोरोनाची भीती नाहीशी झाली आहे. म्हणूनच सामाजिक अंतराची ऐशीतैशी करत हजारो तरुण पार्टी करताना दिसून आले.

सामाजिक अंतराची ऐशीतैशी

देश अनलॉक होताच लोक बेफिकीरपणे वागताना दिसून येत आहेत, जे कोरोनाच्या युद्धामध्ये धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. एकीकडे मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घराबाहेर जाण्याता दंड होऊ शकतो, तर दुसरीकडे हजारो लोक पार्टी करताना दिसले.

दरम्यान, भारतातील कोरोनाची प्रकरणे 43 लाखांच्या पलीकडे गेली आहेत, तर जवळपास 73 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. अश्या परिस्थितीत लोकांचे दुर्लक्ष किती प्रमाणात योग्य आहे? लोकांच्या संरक्षणासाठी सरकार बरीच पावले उचलत आहे, परंतु आता त्यांचीही जबाबदारी बनली आहे की, अशा नाजूक परिस्थितीत मूर्खपणा करण्याऐवजी साथ द्यावी.